वेंगुर्ला /-

तालुक्यातील परबवाडा शाळा नं.१ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप परब यांच्या अध्यक्षतेखाली व परबवाडा सरपंच विष्णू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.परबवाडा शाळा नं.१ चा मागील २ वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कोव्हिड १९ मुळे घेता न आल्याने दोन वर्षाचा एकत्रित कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शारदामातेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी,एस.टी.एस.ब्रेनडेव्हलपमेंट,गणित संबोध यांसारख्या शाळाबाह्यस्पर्धा परीक्षेतील गुणवत्ताधारक,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जि.प.सिंधुदुर्गने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेते,विविध मंडळाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी,शालेय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व शाळेचे विशेष मानकरी अशा प्रकारे एकूण १५० बक्षिसांचे रोख व वस्तू स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर परबवाडा उपसरपंच हेमंत गावडे,माजी सभापती सारिका काळसेकर,डॉ.संजीव लिंगवत,बॅ. बाळासाहेब खर्डेकर काॅलेजचे प्रा.पी.जी.देसाई, माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनिल परब,पौर्णिमा नाईक, हर्षाली गवंडे, कांता देसाई आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका अनिता राॅड्रीग्ज यांनी अहवाल वाचन व शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम व शाळेने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबाबत माहिती दिली. सरपंच विष्णू परब यांनी मागील वर्षी शाळेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या नूतनीकरणसाठी,यावर्षी शाळेच्या खिडक्यांना स्लायडींग व रंगरंगोटी माजी शिक्षण सभापती दादा कुबल यांच्या मार्फत १० लाखाचा निधी,तसेच ग्रामपंचायतीमार्फत स्मार्ट टी.व्ही,फिल्टर दिल्याबद्दल सरपंच, उपसरपंच व संपूर्ण टिमचे आभार मानले.डाॅ.संजीव लिंगवत,प्रा.देसाई यांनी मार्गदर्शन केले. स्वागत अनिता राॅड्रीग्ज, प्रास्तविक विशाल जाधव ,सुत्रसंचालन रामचंद्र झोरे व मिलिंद सरोवदे यांनी आभार मानले.यावेळी बहुसंख्य पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page