वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यातील मठ श्री स्वयंमेश्वर प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मठ या संस्थेच्या चेअरमनपदी सुभाष चंद्रकांत बोवलेकर व व्हाईस चेअरमनपदी सिताराम भास्कर गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी संचालक पदी देवेंद्र लक्ष्मण गावडे, गुंडू बोमडोजी ठाकूर,कानू परशुराम गावडे, शंकर तुकाराम गावडे,यशवंत चिंतामण नाईक, दत्ताराम नारायण होडावडेकर, उमेश प्रकाश नाईक, सुभाष वामन मठकर, संध्या बाबुराव वालावलकर, सुखदा शिवराम ठाकूर, विद्याधर नारायण कडुलकर इत्यादींची निवड करण्यात आली.संचालक मंडळाची सन २०२१-२२ ते २०२६ -२७ ची पंचवार्षिक निवडणूक दि.२२ फेब्रुवारी रोजी झाली होती.यात श्री स्वयंभू कृपा गाव विकास पॅनल ने बाजी मारली होती.
चेअरमनपदी सुभाष बोवलेकर व व्हाईस चेअरमनपदी सिताराम गावडे यांची निवड होताच उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.यावेळी संचालक यांच्यासह माजी सरपंच धोंडू गावडे, संस्थेचे सचिव जयदेव फडतरे, सेल्समन गजानन मांजरेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी संस्थेमार्फत जास्तीत जास्त लोकांना कर्ज देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. संस्थेचे सभासद वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.तसेच संस्थेमार्फत सहकार्य करण्यात येईल, असे नूतन चेअरमन सुभाष बोवलेकर यांनी सांगितले.
