You are currently viewing महिलांनी एकत्र येत सामाजिक कार्यात सहभागी होऊन आपला उत्कर्ष साधावा.;अनुश्री कांबळी

महिलांनी एकत्र येत सामाजिक कार्यात सहभागी होऊन आपला उत्कर्ष साधावा.;अनुश्री कांबळी

  वेंगुर्ला / –

उत्कर्ष साधण्यासाठी महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहे. प्रपंचासोबत सामाजिक कार्यातही सहभागी व्हावे, असे प्रतिपादन वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी खानोली येथे केले.
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा खानोली नाईकवाडी येथे पोषण आहार पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पोषण आहार पाककला स्पर्धेचे उद्घाटन अनुश्री कांबळी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपसभापती स्मिता दामले, परीक्षक ऍड. अनघा तेंडोलकर, साहित्यिक व कवयित्री शामल मांजरेकर, स्वामी सावंत, सुनील नाईक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. अनुश्री कांबळी यांनी ग्रामीण भागात राहूनही स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल महिलांचे कौतुक केले. पोषण आहार, पाककला स्पर्धा अशी थीम घेऊन नीटनेटके आणि सुंदर आयोजन केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील नाईक यांचे विशेष कौतुक केले. ऍड अनघा तेंडोलकर यांनी महिला सक्षमीकरण विषयी मार्गदर्शन केले. स्मिता दामले, शामल मांजरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचे सन्मानचिन्हे प्रायोजक अविनाश दुतोंडकर यांनी शुभेच्छा दिल्या. पोषण आहार शिजविणाऱ्या रेश्मा कांबळी, शिक्षिका नीलम राऊळ यांचाही सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त शिक्षक स्वामी सावंत यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सहभागी स्पर्धकांना अनिल नाईक यांच्या सौजन्याने पाककला पुस्तक  देऊन सन्मानित करण्यात आले. पोषण आहार पाककला स्पर्धेत अनुक्रमे जाई नाईक, मधुरा कांबळी,वर्षा धोंड यांनी प्रथम तीन क्रमांक, तर उत्तेजनार्थ क्रमांक रेश्मा कांबळी,सुभद्रा नाईक त्यांनी मिळविला. विजेत्या स्पर्धकांना अविनाश दुतोंडकर यांच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेसाठी ग्रामस्थ राजेश सातार्डेकर, पुंडलिक वाडेकर, केशव कावले, संतोष गोवेकर, नितीन मुननकर यांनी मदत केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नाईक, नितीन मुननकर, महेंद्र सातार्डेकर, सौरभ नाईक यांनी  मेहनत घेतली.

अभिप्राय द्या..