वेंगुर्ला /-
श्री गिरेश्वर प्रासा. वि.का. स. से. सोसायटी वजराट संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा वजराट येथे संस्था चेअरमन बाबुराव परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना मनीष दळवी म्हणाले की,भविष्यात सहकारी संस्था मिनी बँका करण्याची योजना असून आपण वजराट संस्थेचा विचार करु असे सांगितले.येथील रोजगार वाढवण्यासाठी कर्ज पुरवठा केला जाईल.शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांनी विविध समस्या, अडीअडचणी असतील तर त्या आपल्यापर्यंत पोहोचवाव्यात,आपण निश्चितच सहकार्य करु, असेही ते म्हणाले. यावेळी वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघ संचालक व संस्था संचालक दत्तात्रय वजराटकर, सरपंच महेश राणे, उपसरपंच नितीन परब, नारायण परब, विकास चव्हाण, विजय सावंत भोसले, जगन्नाथ दाभोलकर, अपर्णा करंगुटकर, माजी चेअरमन मनोहर परब, मंगेश परब, दिगंबर पेडणेकर, सुधाकर सावंत भोसले,माजी सरपंच सूर्यकांत परब, रमेश राणे, सचिव पांडुरंग दळवी, रवींद्र पेडणेकर, संस्थेचे सर्व सभासद, ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
