कणकवली /-

कणकवली पंचायत समिती च्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा मंगळवार दि. 23 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. पंचायत समिती कणकवलीच्या नूतन इमारतीचे स्वप्न नामदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून आज पूर्ण होत आहे. या इमारतीसाठी सन 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडुन निधी प्राप्त झाला व सन 2017 मध्ये सदर इमारतीचे भूमिपूजन झाले व आज हे स्वप्न साकार होत आहे.

पंचायत समिती कणकवलीची ही प्रशासकीय इमारत जिल्ह्यातील सर्वात मोठी आहे. पंचायत समीतीचे सर्व विभाग एकाच छताखाली येतील अशी ही पहिलीच इमारत आहे. ग्रामीण भागातील जनतेला एकाच ठिकाणी आपली प्रशासकीय कामे करता यावीत, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत देता यावा तसेच पदाधिकारी यांना अधिकारी, कर्मचारी यांच्याशी थेट व वेळेत संपर्क साधून गोरगरीब जनतेची कामे वेळेत पूर्ण करता यावीत, या उद्देशाने या प्रशासकीय इमारतीची रचना करणेत आलेली आहे. पंचायत समिती कणकवलीने आजपर्यंत  सर्व क्षेत्रात मोठी भरारी घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page