कुडाळ /-
कला व सांस्कृतिक संचनालय गोवा सरकार यांच्यावतीने चेंदवण येथिल चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे मालक देवेद्र नाईक यांना महाराष्ट्र गोवा एकता पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण 21 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथील संगीत सुर्य केशवराव भोसले सभागृह मंगळवार पेठ येथे केंद्रिय आयुषमंत्री श्रीपाद नाईक गोव्याचे मंत्री जयेश साळगावकर सिने अभिनेते विश्वजीत पडते याच्या उपस्थितीत होणार आहे.कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार व प्रतिज्ञा नाट्यरगं संस्था याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र गोवा एकता कला साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. गोवा व महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या गुणवत्तेचा सन्मान म्हणून नाईक यांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे.
