कुडाळ /-

गणेश चतुर्थीच्या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यानी एक दोन नव्हे तर तब्बल सातशे घरगुती गणपतींचे दर्शन घेतले. कुडाळ मालवण मधील आपल्या मतदारसंघासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या घरोघरी जात आमदार वैभव नाईक यांनी दर्शन घेतले. तब्बल सातशे घरांचा उंबरठा ओलांडत लोकांच्या घरोघरी जात वैभव नाईक यांनी हे गणपती दर्शन घेतले.

लोकांच्यामध्ये मिसळणारा सर्वसामान्यांचा आमदार म्हणून वैभव नाईक यांची ओळख आहे. आमदार म्हणून निवडून येण्याच्या आधीपासून आमदार ते दुसऱ्या टर्ममध्ये दरवर्षी जास्त जास्त लोकांच्या घरी गणपती दर्शनाला जातात. गेले दोन वर्षे कोरोनाचा काळ असूनही त्यांची गणपती दर्शनाची ओढ कमी झाली नाही. 2014 साले कुडाळ मालवण मतदार संघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तर 2019 आली ते दुसऱ्यांदा याच मतदारसंघातून विधानसभेवर गेले. गणपतीच्या आधी चार-पाच दिवस प्रत्येक घराघरात तेल, साखर, कापूर,अगरबत्ती, गणपतीचे कॅलेंडर प्रत्येकाच्या घरी घरी जाते. आमदार झाल्या पासूनही आतापर्यंत अशी प्रथा त्यांनी चालू ठेवली आहे.

कोणत्याही वेळी फोन करा आणि कोणी करा आमदार वैभव नाईक फोन उचलून समोरच्याची समस्या पहिल्यांदा ऐकून व समजून घेतात. यानंतर आपल्या क्षेत्रातील पुढचे काम असो संबंधित अधिकारी, संबंधित खात्याचा मंत्री त्याला तात्काळ फोन करून कामाचा निपटारा करण्याची त्यांची पद्धत वाखानण्याजोगी आहे. अधिकाऱ्याशी पण चढ्या आवाजात न बोलता अत्यंत संयमाने शांतपणे एखाद्यावर झालेला अन्याय ते पटवून सांगतात आणि काम करण्याची विनंती करतात. कुडाळ, मालवण, कणकवली मधील शिवसेनेची शाखा असो अथवा कणकवलीतील वैभव नाईक यांचा स्वतःच कार्यालय हे शिवसैनिकांचा जणू माहेरघरच आहे. सर्वसामान्यत मिसळणारे हे लाडके जनतेचे आमदार आहेत.

गणपतीच्या निमित्ताने त्याच्या घरी जाणे, जमिनीवर बसून केळीच्या पानातील जेवण जनतेत मिसळून घेणे. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे. वैभव नाईकांच्या अंगवळणी पडले आहे. निश्चितच ह्या जनसामान्यांच्या आमदारांची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. अकरा दिवसाच्या गणपती विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी रात्री आमदार वैभव नाईक मुंबईला रवाना झाले आहेत. बुधवारी व गुरुवारी दोन दिवस मंत्रालयातील काम करून आटपून पुन्हा ते आपल्या मतदार संघात दाखल होणार आहेत. मग पुन्हा सुरू होईल त्यांच्या नेहमीच्या रूटीन प्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांना भेटणे. त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि मार्गी लावणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page