प्रशासन बघ्याच्या भुमिकेत!विरोधी पक्ष मात्र तेरी भी चुप मेरी भी चूप च्या भुमिकेत

कोट्यवधींचा शासनाचा महसुल बुडवणा-या या अधिका-यांची लोकायुक्त मार्फत खातेनिहाय चौकशी करण्याची होत आहे मागणी..

कुडाळ /-

सध्याचे रस्ते दोन वर्षात खराब झाले कि,सत्ताधारी पक्षाच्या नावाने रान उठवायचे मात्र सध्या चोरीच्या वाळु डंपर वाहतुकीमुळे कुडाळ मालवण व पिंगुळी पाट, कवठी ते कुडाळ या रस्त्यांची चाळण झाली असुन,फक्त सत्ताधारी पक्षावर खापर फोडून मोकळे न होता विरोधी पक्ष मुग गिळून गप्प का? असा सवाल जनतेतुन होत आहे.

पोलिसांनी एक डंपर पकडला की, चिरीमिरी दिली. काय झालं, महसूलने डंपर पकडला सेटलमेंट झाली की डंपर सुटला, तर खनिकर्मच्या अधिका-यांनी डंपर पकडला की सेटलमेंट मग कोट्यवधींचा शासनाचा महसुल बुडवणा-या या अधिका-यांची लोकायुक्त मार्फत खातेनिहाय चौकशी व्हावी.अशी मागणी होत आहे.तर रात्रभर जवळपास हजारो संख्येने डंपर चोरटी वाळु वाहतुक करीत असताना रस्ते खड्डेमय जाणार नाहीत. तर गंगामय होतील काय?असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.

तसेच सत्ताधारी पक्षाच्या नावाने खासदार आमदार पालकमंत्री यांच्या नावाने टाहो फोडण्या पेक्षा तुम्हीही विरोधी पक्ष म्हणून काय करणार? असा सवाल जनतेतुन होत आहे.की,सत्ताधाऱ्या प्रमाणेचं तेरे भी चुप मेरे भी चुप असेच करत राहणार का?असा सवाल व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page