सिंधुदुर्गनगरी / –

गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन त्यांच्या नियोजनासाठी आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी खारेपाटण तपासणी नाका, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कणकवली रेल्वे स्टेशनला भेट दिली.यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.*

खारेपाटण तपासणी नाक्यावर वाहनांच्या थांब्याबाबत नियोजन करावे, वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, परिवहन मंडळाने एस.टी.तील प्रवाशांच्या तपासणीसाठी स्वतंत्र बुथ उभारावा, तपासणीसाठी आरोग्य विभागाने पथकांची संख्या वाढवावी, तपासणी नाक्यावर मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी, रेल्वे स्टेशन येथे रेल्वे पोलिसांनी पथकांची संख्या वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.

पोलीस पथकांची संख्या वाढवण्याची सूचना पोलीस अधिक्षक यांनी यावेळी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी खारेपाटण तपासणी नाका येथील वाहनतळाची ही पहाणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page