You are currently viewing जिल्हा बँकेची निवडणूक सतिश सावंतांच्या नेतृत्वाखालीचं लढविणार.;खा.विनायक राऊत..

जिल्हा बँकेची निवडणूक सतिश सावंतांच्या नेतृत्वाखालीचं लढविणार.;खा.विनायक राऊत..

 आगामी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ही सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल.कोणी कीतीही टिवटिव करण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेनेलाच त्या ठीकाणी निश्चित यश मिळेल, असा विश्वास खासदार विनायक राउत यांनी आज येथे व्यक्त केला.


कुडाळ /-

दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न राणेच सोडवू शकतात, असे सांगून नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे.याबाबत ते आत्ता गप्प का ?, याचे उत्तर त्यांनी दयावे,असेही ते यावेळी म्हणाले.श्री.राउत यांनी आज कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी आमदार वैभव नाईक जान्हवी सावंत,बबन शिंदे,हरी खोबरेकर,महेश कांदळगावकर,मंदार केणी आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.राऊत म्हणाले,चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे काम पुर्ण झाले आहे.त्यामुळे चतुर्थीपुर्वी विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे.तर त्या दृष्टीने आवश्यक असलेल्या परवानग्या मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.असेही त्यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..