न्यू इंग्लिश स्कूल, कसाल येथे भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..

न्यू इंग्लिश स्कूल, कसाल येथे भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..

ओरोस /-

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविदयाल, कसाल येथे भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री नवीन बांदेकर (शाळा समि ती अध्यक्ष, कसाल) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच संस्था सचिव श्री यशवंत परब यांनी विदयार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रशालेतर्फे वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, देशभक्ती गीत गायन ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे भाषण व गीत गायन याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच संस्थेच्या चारही भाग शाखेतील दहवी व बारावी तील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार आयोजित करू ण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री विनोद करंदिकर, निवृत्त मुख्याध्यापक रायपाटण हे उपस्थित होते व संस्था अध्यक्ष श्री आनंद सावंत उपस्थित होते.

विदयार्थ्यांनी नम्रता व लिनता हे गुण आत्मसाद करून, नाविन्याचा शोध सतत घेत राहिले पाहिजे. त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे सुजाण नागरिक बन विण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यामुळे शिक्ष कांनी त्यागी भावनेतून या पवित्र क्षेत्रात कार्य केले पाहिजे असे विचार श्री करंदिकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी श्री प्रभाकर सावंत, श्री अवधूत माल • नंददिपक णकर, श्री यशवंत परब यांनी विदयार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गुरुदास कुसगांवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

होते

अभिप्राय द्या..