सावंतवाडी /-

महसूल दिनाचे औचित्य साधून प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती निशा पवार यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन गोरविण्यात आले. ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयाय के. मंजू लक्सशमी, अतिरिक्त जिल्हाधिकारी व सर्व प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

श्रीमती निशा पावर यांनी भुसापादनाचे काम उत्कृष्टरित्या केले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामी सोपावलेली कामे वेळेत पार पाडली आहेत. तसेच covid च्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या काळातील उपविभागातील अडकलेले परप्रांतीय मजूर, विद्यार्थी, प्रवासी, पर्यटक यांना त्यांच्या गावी पोहोचविन्या करिता चांगले काम केले आहे. कोविड विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्ती आढळून आल्यास आरोग्य विभागाशी समन्वय साधून संबंधित क्षेत्र, प्रतिबंधित क्षेत्र घोषित कारण्याबाबतचे आदेश तयार करणे, दूरध्वनी वरून संपर्क साधून अद्ययावत माहिती देणे आदी कामे त्यांनी उत्कृष्ट रित्या पार पडलेली आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आदर्श कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page