बांदा /-
उमेद फौउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कोरोना जनजागृती अभिव्यक्ती स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं .१शाळेची विद्यार्थीनी कुमारी सानिका आत्माराम नाईक हीने राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा ज्यरी अवार्ड पुरस्कार प्राप्त केला.
उमेद फौंडेशन यांच्या वतीने गरजू व निराधार मुलांसाठी लोकसहभागातून मायेचं घर उभारले जात असून याची जनजागृती व्हावी यासाठी उमेद फौउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय कोरोना जनजागृती आॅनलाईन अभिव्यक्ती स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. राज्यभरातून या स्पर्धेत ३४४स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. बांदा केंद्र शाळेतून सानिका आत्माराम नाईक, सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर, पूर्वा हेमंत मोर्ये,दत्तराज नरसिंह काणेकर, समर्थ सागर पाटील सिमरन सुधीर तेंडोलकर, समर्थ लक्ष्मण देसाई, दूर्वा तानेश्वर गवस, चैतन्या उमेश तळवणेकर या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन कोरोना विषयी जनजागृती केली होती या सर्व विद्यार्थ्यांना उमेद फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आॅनलाईन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
उमेद फौंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुयश मिळविल्याबद्द्ल विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्याध्यापक सरोज नाईक ,सरपंच अक्रम खान केंद्र प्रमुख संदीप गवस,विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर ,गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले आहे.
या विद्यार्थ्यांना उपशिक्षक जे. डी पाटील ,रंगनाथ परब, उर्मिला मौर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे ,जागृती धुरी, प्राजक्ता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.