वेंगुर्ले एस.टी. आगारातर्फे उद्यापासून जिल्ह्याबाहेर बससेवा सुरु : निलेश वारंग..

वेंगुर्ले एस.टी. आगारातर्फे उद्यापासून जिल्ह्याबाहेर बससेवा सुरु : निलेश वारंग..

वेंगुर्ला /-
वेंगुर्ले आगारातर्फे उद्या सोमवार १४ जूनपासून कोल्हापूर,रत्नागिरी व अक्कलकोट या मार्गावर बसफेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत,अशी माहिती वेंगुर्ले एस.टी. स्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी दिली.यामध्ये वेंगुर्ले मठमार्गे अक्कलकोट सकाळी ७ वा., अक्कलकोट वेंगुर्ले सकाळी ५ वा.,वेंगुर्ले मठमार्गे रत्नागिरी सकाळी ६.३० वा.,रत्नागिरी वेंगुर्ले दुपारी २ वा., वेंगुर्ले – मठ – कुडाळ – गगनबावडामार्गे कोल्हापूर (वस्तीची फेरी) दुपारी १.१५ वा.,कोल्हापूर वेंगुर्ले सकाळी ७ वा. अशा बसफेऱ्या सुटणार आहेत.दरम्यान ७ जून पासून सोडण्यात आलेल्या परंतु २ दिवस स्थगित करण्यात आलेल्या बसफेऱ्या पूर्ववत सुरु होणार आहेत.उद्यापासून सुरु होणाऱ्या सदरच्या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा,असे आवाहन वेंगुर्ले एस.टी.स्थानकप्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..