मसुरे /-
पळसंब बौद्धवाडी समाजमंदिर येथे कोव्हिडं १९ प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य उपकेंद्र त्रिंबक व ग्रामपंचायत पळसंब यांच्या सहकार्याने राबविण्यात आली.
यावेळी ११० डोस देण्यात आले.
लसीकरणाचा शुभारंभ सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते बुद्ध प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला. यावेळी उपसरपंच श्री सुहास सावंत उपस्थित होते.
या मोहिमेसाठी प्राथ आरोग्य केंद्र आचरा डॉ. जाधव , डॉ. साळकर, परिचारिका श्रीम पवार, आरोग्य सेवक श्री गणेश यादव यांचे सहकार्य लाभले.
लसीकरण नोंदणी करीता रोशन चिंचवलकर,अमरिश पुजारे, प्रमोद सावंत,भिकाजी पळसंबकर यांनी सहकार्य केले. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना चहा बिस्कीट व बिसलेरी पाण्याची व्यवस्था जेष्ठ मार्गदर्शक श्री गिरीधर पुजारे यांनी केली.
लसीकरणासाठी ग्रामसेवक श्री युवराज चव्हाण, झोनल अधिकारी श्री राजेंद्रप्रसाद गाड , राजन पुजारे ,झिलू जंगले, मुख्या श्रीम असरोडकर मॅडम, श्रीम पवार मॅडम, आशा सेविका श्रीम अनुजा परब,अंगणवाडी मदतनीस,ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.
लसीकरणासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच जागा उपलब्ध करून देणारे बौद्ध विकास मंडळ पळसंब यांचे सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांनी आभार मानले.