मसुरे /-
बांदिवडे पालयेवाडी येथील सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी व जेष्ठ हौशी रंगभूमी कलाकार
श्री. श्यामसुंदर हरिश्चंद्र परब (७५ वर्ष) यांचे
राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, तीन भाऊ, भावजयी,दोन बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत परब यांचे ते बंधू होत.