कुडाळ /-
कलर्स वाहिनीवरील स्वामी भक्तांची आवडती ” जय जय स्वामी समर्थ ” ह्या मालिकेचे स्वामींची भूमिका साकारणारे अभिनेते ” श्री .अक्षय मुडावदकर यांना प्रतिमा देऊन कुडाळ येथे स्वागत आणि पुर्ण टीम चा गौरव करण्याची संधी आमचे मित्र सुप्रसिद्ध आंबा व्यावसायिक केदार राऊळ यांच्यामुळे मिळाली.
मालिकेचे चित्रीकरण गोवा येथे चालू होते .परंतु अलीकडेच गोवा येथे चित्रीकरण बंद झाल्याने ते मुंबई येथील परतीच्या मार्गावर जात असताना भेट झाली सदर मालिकेच्या पूर्ण टीमला अलीकडेच आमचे मित्र आंबा व्यावसायिक श्री. केदार राऊळ यांनी हापूस आंब्याची सेवा त्यांच्या मागणीनुसार पुरवली होती त्यांनी मुंबईला जातेवेळी पुन्हा हापूस आंबा पसंतीस उतरल्याने ऑर्डर दिली होती .निमित्त होतं हापूस आंब्याचं परंतु श्री स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका साकारणारे श्री. अक्षय मुडावदकर व टीमला भेटून त्यांना शुभेच्छाही दिल्या आणि श्री स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन त्यांचा गौरवही केला आणि आध्यात्मिक समाधान सुद्धा लाभले यासाठी साहिल पोरे यांचंही सहकार्य लाभले. लीइच्छाशक्ती प्रबळ असेल तर अशक्य ही शक्य करतील.