माणगाव प्रा.आ.केंद्रासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व नवीन ऍम्ब्युलन्स देणार.;आ.वैभव नाईक

माणगाव प्रा.आ.केंद्रासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व नवीन ऍम्ब्युलन्स देणार.;आ.वैभव नाईक

माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला आ.वैभव नाईक यांनी दिली भेट..

कुडाळ /-

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.डॉ.उमेश पाटील यांच्याकडुन समस्या जाणून घेतल्या.तसेच माणगाव प्रा.आ.केंद्रासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व नवीन ऍम्ब्युलन्स देणार असल्याचे सांगितले. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या ब्लड रिपोर्टचा आढावा त्यांनी घेतला. तसेच जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधून माणगाव प्रा.आ.केंद्राला उद्यापर्यंत अँटीजेन टेस्ट किट देण्याबाबतच्या सूचना आ.वैभव नाईक यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. माणगाव प्रा.आ. केंद्राच्या मंजूर असलेल्या कामांबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांच्याशी चर्चा करून मंजूर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. याठिकाणी बंद असलेल्या सौर युनिटची दुरुस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली.तसेच औषध पुरवठा, लक्षणे असलेल्यांची कोविड टेस्ट, लसीकरण मोहीम याचा आढावा घेण्यात आला.काही अडचणी आल्यास आपल्याशी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन यावेळी आ.वैभव नाईक यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले. आशा सेविकांनी आ.वैभव नाईक यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या त्या सोडविण्याची ग्वाही देत आशा सेविकांना पीपीई किट, मास्क, हॅन्डग्लोज व इतर साहित्याचा पुरवठा करण्यात येईल असे आ.वैभव नाईक सांगितले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल गवाणकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, जि.प.सदस्य राजू कविटकर,उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, प.स.सदस्या मथुरा राऊळ, विभाग प्रमुख अजित करमलकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, विभाग संघटक कौशल जोशी, रामा धुरी, बंड्या कुडतरकर, रमाकांत धुरी, बापू बागवे, अनुप नाईक, ग्रामसेवक श्री. कोलते, तलाठी श्री.शेणई आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..