कुडाळ /-
जिल्ह्यात कोरोना आजाराचे संकट कायम असून त्यामुळे रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी शिवसेनेने रक्तदानाची मोहीम जिल्ह्यात राबविली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून कुडाळ तालुक्यातील शिवसेना सरपंच,उपसरपंच,ग्रा.प. सदस्य संघटनेच्या वतीने पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले, त्याला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.यावेळी सरपंच संघटनेच्या वतीने मान्यवरांना वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,उपसभापती जयभारत पालव, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, कुंदे सरपंच सचिन कदम, हुमरस सरपंच अनुप नाईक, मांडकुली सरपंच तुषार सामंत, आवळेगाव सरपंच सुनील सावंत, कवठी सरपंच रुपेश वाडयेकर,संतोष पाटील आदीसह सरपंच, उपसरपंच ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.