बंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी..

बंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी..

कुडाळ /-

कुडाळ शहरात ०७ मे.२०२१ पासून ते १५ मे.पर्यंत होणाऱ्या बंदच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी कुडाळ शहरात लोकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती.यात सोशल डिस्टंसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला होता असे दिसून आले.कुडाळ शहरासह तालुक्यात कोरोनाचा फैलाव खुप मोठ्या प्रमाणात होत असून त्याच पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात ०७ मे ते १५मे. या दिवसांसाठी जनता कर्फ्यूची घोषणा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.त्यामुळेच जीवनावश्यक वस्तूंच्या आणि अन्नधान्याच्या खरेदीसाठी आज कुडाळ शहरात आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी तोबा गर्दी केली होती. त्यात सोशल डिस्टंसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला आहे. या जनता कर्फ्यूच्या काळात लोकांनी नियमांचे पालन करून स्वतःसोबत दुसऱ्यांचाही जीव वाचवणे खुप गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य दक्षता घेऊन पाऊल उचलणे आवश्यक आहे.

अभिप्राय द्या..