आचरा /-
आचरा आणि लगतच्या गावांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे. या मुळे सुरक्षेचा उपाय म्हणून
आचरा ग्रामपंचायतीने प्राणजीवन सहयोगी संस्था शिरवल ता.कणकवली यांच्या सहकार्याने आचरा गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणीचे काम हाती घेतले आहे. आचरा बंदर, आचरा बाजारपेठ,मच्छी मार्केट, आचरा तिठा, शासकिय गोदाम,आचरा परिसरातील मंदिर परिसर आदी सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी सायंकाळी या फवारणीस सुरुवात करण्यात आली यावेळी माजी सरपंच मंगेश टेमकर, सदस्य योगेश गावकर, राजेंद्र परब, ग्रामविकास अधिकारी गणेश परब,लिपिक नरेश परब, रुपेश परब आदी उपस्थित होते.
आचरा ग्रामपंचायत कडून जाहीर आवाहन
आचरा गावात सातत्याने कोरोणाचे प्रमाण वाढत आहे. गावात आपल्या शेजारी किंवा आपल्या कुटुंबात परजिल्ह्यातुन अथवा परराज्यातुन कोणी नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य आल्यास त्याबाबची सर्व माहिती पोलीस पाटील, आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका तसेच आचरा ग्रामपंचायतीकडे द्यावयाची आहे. जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला१४ दिवस होम कॉरंटाईन बंधनकारक आहे. सर्दी ताप , खोकला , अंगदुखी, अशक्तपणा , इ लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून रॅपिड अथवा आरटीपीशीआर कोरोना चाचणी करण्याचे आवाहन आचरा ग्रामपंचायत सरपंच तथा ग्रामसमिती अध्यक्ष प्रणया टेमकर यांनी केले आहे