मालवण कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून आवश्यक साहित्याच्या किटचे वितरण..

मालवण /-


मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे शासकीय कोविड केअर सेंटर सुरू असून याठिकाणी सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊन कालावधी लक्षात घेता कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने येथे दाखल असलेल्या कोविड रुग्णांना आवश्यक असणारे साबण, टूथ ब्रश ,टूथ पेस्ट, तेल, पावडर व अन्य साहित्य सुलभ उपलब्ध व्हावे या हेतूने या वस्तूंचे किट मोफत स्वरूपात देण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बालाजी पाटील यांच्याकडे किट बॉक्स सुपूर्द करण्यात आला.यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक पंकज सादये, उमेश मांजरेकर, संमेश परब, तपस्वी मयेकर, बाळू नाटेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..