कणकवली /-
येथील वारकरी सांप्रदायाचे प्रतिनिधी साबाजी मेस्त्री व श्याम पाताडे यांच्या वतीने पटवर्धन चौक येथे कार्यरत असणाऱ्या आरोग्य पथकातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच न.पं.चे कर्मचारी यांना फेसशिल्डचे वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे, उपनिरीक्षक सुरज पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, वाहतूक पोलीस संदेश आबिटकर आदी उपस्थित होते.