१२ बलुतेदारांच्या कोरोनाच्या लॉकडाउन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी भाजपओबीसी च्यावतीने कुडाळ तहसीलदाराकडे मागणी

१२ बलुतेदारांच्या कोरोनाच्या लॉकडाउन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी भाजपओबीसी च्यावतीने कुडाळ तहसीलदाराकडे मागणी

कुडाळ /-

5 एप्रिल 2019 पासून राज्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आपण राज्यात लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे दुकान सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु न्हावी, सुतार कुंभार, शिंपी,परीट इत्यादी बारा बलुतेदारांना मध्ये छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहे त्यामुळे आधीच गरीब परिस्थितीत असलेला हा समाज लोकडाऊन मुळे आर्थिक जास्त अडचणीत आलेला आहे. एक प्रकारे या समाजावर उपासमारीची पाळी आलेली आहे आपण लॉकडाऊन जाहीर करताना ऑटो रिक्षा चालक बांधकाम मंजूर फेरीवाले इत्यादी लोकांकरिता आर्थिक सहाय्य जाहीर केले परंतु न्हावी, शिंपी, कुंभार, परीट इत्यादी बारा बलुतेदारांसाठी कुठलेही आर्थिक सहाय्य जाहीर केलेले नाही. याकरिता आपण राज्यातील बारा बलुतेदार बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून बारा बलुतेदारी परंपरागत व्यवसाय करीत व्यवसायिकांना प्रति कुटुंब किमान 5000/- रुपये आर्थिक सहाय्य द्यावे अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चा यांनी माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केली व माननीय जिल्हाधिकारी महोदय सिंधुदुर्ग कार्यालय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसेच आपल्या जिल्हात कोरोना रुग्णाच्या बाबतीत बेड उपलब्ध होत नाही याकरिता कोविड केअर सेंटर तालुका स्थायी सुरू करून पूर्ण रुग्णांची व्यवस्था उपचार कसे चांगले होईल याबाबत आपण शासन स्तरावर प्रयत्न करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

त्यावेळी उपस्थित ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर, महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, कुडाळ शहर अध्यक्ष नगरसेवक राकेश कांदे, महिला शहराध्यक्ष ममता धुरी, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष चंदन कांबळी,सो.मि अध्यक्ष राजवीर पाटील,सरपंच संघटना कुडाळ अध्यक्ष नागेश परब आधी पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..