मुंबईतील बेस्ट सेवेमधून सिंधुदुर्ग विभागाला वगळण्यातसाठी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष अशोक राणे यांची मागणी..

मुंबईतील बेस्ट सेवेमधून सिंधुदुर्ग विभागाला वगळण्यातसाठी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष अशोक राणे यांची मागणी..

कणकवली /-

मुंबईतील बेस्ट सेवेसाठी सिंधुदुर्ग विभागातून चालक-वाहक पाठविले जात आहेत. मात्र यातील बहुतांश कर्मचारी कोरोना बाधित होत आहेत. त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय देखील कोरोना बाधित होत असून इतरांनाही कोरोना संसर्गाचा धोका आहे. बेस्ट सेवेतून सिंधुदुर्गला वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेसचे सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष अशोक राणे यांनी केली आहे. श्री. राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह, एस. टी. महामंडळाला याबाबतचे पत्र दिले आहे… यात म्हटले की, सप्टेंबर २०२० पासून मुंबईतील बेस्ट सेवेसाठी सिंधुदुर्गातून चालक आणि वाहक पाठवले जात आहेत. यात आजतागायत अनेक चालक वाहक आणि त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित झाले. त्याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागला.

सध्या मुंबईतून आलेल्या चालक-वाहकांची कोरोना चाचणी केली जाते. या चाचणीचे निकाल येण्यासाठी ४ ते ५ दिवस लागतात. तोपयर्ंत या चालकांना घरी जात येत नाही. यात त्यांचे मोठे हाल होत आहेत. तसेच चालक वाहक हे गावातून आले असल्याने गावातही कोरोना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे गावातील लोकही त्यांना मुंबईला पाठवायला तयार होत नाहीत. या सर्वांचा विचार करून सिंधुदुर्ग विभागातील एस.टी. चालक वाहकांना मुंबई बेस्ट सेवेसाठी पाठवू नये अशी मागणी अशोक राणे यांनी केली आहे.

अभिप्राय द्या..