सर्पदंश झालेल्या कातवड येथील ७० वर्षीय वृद्धेला जीवदान…

सर्पदंश झालेल्या कातवड येथील ७० वर्षीय वृद्धेला जीवदान…

मालवण /-
तालुक्यातील कातवड येथे राहणाऱ्या आशा चंद्रकांत पवार या ७० वर्षीय महिलेला आज सकाळी कोब्रा जातीच्या विषारी सापाने दंश केला. तिने आरडाओरड केली असा घरातील मंडळींनी धाव घेतली. वृद्धेला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कपिल मेस्त्री व डॉ. मालविका झाटये यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले.
सापाने चावा घेतल्यानंतर ऑक्सीजन पातळी अगदी ४० पेक्षा खाली आलेल्या वृद्धेवर उपचार करून डॉक्टरांनी तिला जीवदान दिले. सद्यस्थितीत डॉक्टरांच्या निगराणीखाली तिला ठेवले आहे. डॉक्टरांनी तत्काळ उपचार केल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तत्काळ उपचार करत जीवदान देणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे नातेवाईकांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..