सिंधुदुर्ग /-
नाशिक दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज तातडीने जिल्हा रुंगणालयाला भेट देऊन तिथल्या ऑक्सीजन पुरवठा व्यवस्थेची पहाणी केली आहे.
नाशिक येथील रुंगणालयात आज सकाळी गॅस गळतीमुळे ‘कोरोना’ चे २२ रुग्ण दगावल्याच्या दुर्घटनेची बातमी समजताच जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक दाभाडे या दोघांनी आवारातील कोविड वॉर्ड ला भेट देऊन रुंगणाना सुरळीतपणे ऑक्सीजन पुरवठा होत असल्याची खात्री करून घेतली.
जे रुंगण व्हेंटिलेटरवर आहेत त्यांचे व्हेंटिलेटर सुरळित सुरू आहेत की नाही याची खातरजमा करून घेतली.त्यानंतर त्यांनी ऑक्सीजन तयार करून तो ज्याठिकाणी सिलिंडरमध्ये भरण्यात येतो त्या इमारतीबाहेरील प्लांटलाही भेट दिली.या भेटीत त्यांनी संबंधित कर्मचारी वर्गाला योग्य ती खबरदारी व काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
त्यानंतर दोघांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात बैठक घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील,डॉ.अपर्णा गावकर,डॉ.शाम पाटील,डॉ.अविनाश नलावडे यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली तिथल्या परिस्थितीचा ,उपचार पद्धती तसेच एकूण कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला.