वेंगुर्ला /-
भाजपाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील पाल ग्रामपंचायत हद्दीतील गोडवणेवाडी येथील कंटेनमेंट झोनमध्ये निर्जंतुकीकरणासाठी जंतूनाशकाचा मोफत पुरवठा करण्यात आला.पाल – गोडवणेवाडी येथील जगदंब ग्रुप यांचेकडे दोन कॅन जंतूनाशक सुपूर्द करण्यात आले .भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे,की ज्याप्रमाणे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी सेवाकार्य केले होते, त्याचप्रमाणे दुसऱ्या लाटेमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जनतेला थेट मदत करावी.तसेच कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य निर्बंध पाळले जावेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध वाडी – वस्त्यांमध्ये युवकांची ‘कोव्हिड अनुशासन कमीट्या’ बनवाव्यात अशी महत्त्वाची सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे .याच अनुषंगाने गावातील वाड्यांमध्ये अशा प्रकारच्या समित्या बनवुन लोकांना भाजपाच्या वतीने मदत करणार असल्याचे प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी सांगितले.यावेळी तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर,शक्ती केंद्र प्रमुख कमलेश गावडे,ओंकार गावडे , गौरव गावडे,हेमंत आंगचेकर , किरण आंगचेकर,पिंट्या गावडे , गुरु गावडे,लीलु गावडे,बबलु गावडे,सुजल वारंग, सुजल शेटकर आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.