कमी रक्तदाब म्हणजे लो ब्लड प्रेशरचा आजकाल अनेकांना त्रास असतो. अगदी नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेल्यांनासुद्धा लो ब्लड प्रेशरचा त्रास असतो. आपण काय खातो-पितो, आपल्या कामाच्या सवयी, वैयक्तिक आयुष्यात असलेला ताण-तणाव या सर्व गोष्टींचा आपला ब्लड प्रेशरवर परिणाम होत असतो. रक्तदाब कमी असल्याने हृदय, मेंदू किंवा इतर अवयवांना कमी रक्त पुरवठा होत असेल, तर त्वरित उपाययोजनेची आवश्यकता असते.
हे आहेत घरगुती उपाय :

१) सकाळी उपाशीपोटी मानुक्याचे सेवन करावे.
२) तुळशीची पाने खावी. या उपयानेही नियंत्रण मिळवता येते.
३) ज्येष्ठमधाचा काढा घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
४) बदामाचं दूध रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरतं. दुधात थेट बदाम न टाकता त्याची पेस्ट करून टाकावी.
५) नारळपाणी, लिंबूपाणी, गाजराचा रस, बीट रस आदींचे नियमित सेवन करा.
६) बदाम, रताळी, पालक, दूध, चीज, अंडी, मासे यांचा समावेश आहारात करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page