आचरयातही विनाकारण फिरणाऱ्यांवर रॅपिड टेस्टचा दट्टा.;टेस्ट मध्ये एक पाॅझेटीव्ह

आचरयातही विनाकारण फिरणाऱ्यांवर रॅपिड टेस्टचा दट्टा.;टेस्ट मध्ये एक पाॅझेटीव्ह

आचरा /-

संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणारयांना आळा बसण्यासाठी आचरा पोलीसांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने आचरा तिठ्यावर रॅपिड टेस्ट सुरू केल्याने अवास्तव फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.या टेस्ट मध्ये एक पाॅझेटीव्ह मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक संचार बंदी चे आदेश दिले आहेत.तरीही काही जण विनाकारण फिरत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आल्यामुळे आचरा पोलीसांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारयांच्या सहकार्याने अकस्मात आचरा तिठा येथे रॅपिड टेस्ट सुरू केली. या वेळीसरपंच प्रणया टेमकर, ग्रामविकास अधिकारी गणेश परब,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ शामराव जाधव, आरोग्य सेविका कविता डाके,पुजा कदम,आरोग्य सेवक विठ्ठल ठाकूर,एस एस पावसकर,आचरा पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशिक्षणार्थी अधिकारी संतोष वाकचौरे, पोलीस कर्मचारीअक्षय धेंडे, अनिकेत सावंत, जयश्री मलमे, स्वप्नील भोवर यांसह होमगार्ड आदी उपस्थित होते.यावेळी घेण्यात आलेल्या टेस्ट मध्ये एक जण पाॅझेटीव्ह मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

अभिप्राय द्या..