सिंधुदुर्गनगरी /-

वादग्रस्त ठरलेले व सध्या निलंबित असलेले तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांची मनमानी अद्यापही सुरू असून कोविद-१९ संदर्भातील तसेच इतर महत्वाच्या फाईल्स,मंजुरीसाठीची लाखो रुपयांची बिले त्यांच्या बंगल्यावर गेले कित्येक दिवस पडून असून गाडीसुद्धा अध्याप ताब्यात दिलेली नाही.परिणामी जिल्हा रुंगणालयातील डॉक्टर्स, सर्व कर्मचारी त्रस्त झाले आहेत.जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे परवा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कणकवली येथे पत्रकारांनी यासंदर्भात त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की,चव्हाण हे पाच दिवस पोलीस कोठडीत राहिल्याने ते आपोआपच सेवेतून निलंबित झाले आहेत.शिवाय त्यांच्याकडे सध्या कोणताही चार्ज नाही त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक पदावर बसून कारभार हाकण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही.तरीही ते कार्यालयात येत असतील आणि सर्वांना त्रास देत असतील तर त्यांच्यावर रीतसर कारवाई करा अशा स्पष्ट सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्याना दिल्याची माहिती दिली.
त्यानुसार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी तात्काळ आरोग्य विभागाच्या राज्य आयुक्त यांच्या नजरेस ही बाब आणली.मात्र आयुक्तांनी आज सायंकाळपर्यंत याबाबत कोणतीच कारवाई केली नसल्याने जिल्हा रुंगणालयातील डॉक्टर्स,अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत.दरम्यान काही कार्यालयीन कर्मचारी त्यांच्या बंगल्यावर फायली ,टपाल तसेच खर्चाची बिले आणण्यासाठी गेले असता चव्हाण यांनी त्यांना लेखी आदेश आणा मगच मी देईन ‘असे उत्तर दिले.
बंगल्यावर असलेल्या गाडीचा ताबा देण्यासही त्यांनी नकार दिल्याचे समजते.श्री चव्हाण हे आज सायंकाळी तातडीने मुंबईला रवाना झाल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page