अज्ञाता विरोधात कुडाळ पोलीस स्टेशनमद्धे तक्रार..
कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील रागंणा तुळसुली -घावनळे रास्तालगत अज्ञाताने हजारो बाॅयलर कोंबडी गोणीत भरून टाकल्या आहेत,या रस्त्यावर ठिकठिकाणी अशा मेलेल्या कोंबड्यांनी भरलेल्या पिशव्या टाकण्यात आल्या आहेत.यामुळे येथील संपूर्ण परीसरात दुर्गंधी पसरली असून हा किळसवाणा प्रकार कोणी केला त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी येथील माशाचीवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
रांगणा तुळसुली व बामणादेवी परीसरात पोल्टी व्यवसायीक मोठ्या प्रमाणात आहेत यातीलचं कोणीतरी मेलेली कोंबडी रस्त्यावर टाकली असण्याचा संशय येथील नागरिकांना आहे तशी तक्रार देखील कुडाळ पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.एकीकडे कोरोना सारख्या महामारीला नागरीक तोंड देत असताना हा किळसवाणा प्रकार कोणी केला त्याच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.