कुडाळ /-
गेली चाळीस वर्षे कोणत्याही राजकीय पुढा-याने चेंदवणी तेंडोली रस्त्याकडे लक्ष दीले नव्हते परंतु आमदार वैभव नाईक यांनी दीला शब्द आणि तो पुर्ण केला तर प्रत्यक्षात अडीच कोटी रुपयांचा निधी देऊन रस्ता पुर्ण केला असल्याने आमदार वैभव नाईक यांचे आभार तेंडोली चेंदवणी येथील अपंग बांधव आणि संजय गांधी निराधार समीती सदस्य दीलीप सर्व्हेकर यांनी मानले.आज दीलीप सर्व्हेकर सरपंच सौ पुजा सर्व्हेकर माजी सरपंच संतोष पाटील यांनी आमदार वैभव नाईक यांची कुडाळ शिवसेना कार्यालयात भेट घेऊन आभार व्यक्त करताना सांगितले की आमच्या या मागणी कडे कोणीही लक्ष दीले नव्हते तेंडोली किंवा आंदुर्ले गावामधील जी जी कामे सांगितली ती ती कामे पूर्ण केली आज एवढा मोठा निधी अडीच कोटी चा देऊन रस्ता पुर्ण केला म्हणून आम्ही आज आमदार वैभव नाईक यांचे आभार मानताना आंदुर्ले गावामध्ये मोबाईल टॉवर पुर्णत्वास जात आहे तसेच आंदुर्ले खिंड ते आंदुर्ले पिंपळ रस्ता मंजुरी दीली अशा या कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी आहोत असेही श्री सर्व्हेकर म्हणाले.