नगरसेविका तथा जिल्हा नियोजन सदस्या सौ.तेरसे यांच्या प्रयत्नांना यश..
कुडाळ /-
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागाच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजने अंतर्गत (७ लक्ष) जिल्हा नियोजन समिती सदस्य ,कुडाळ च्या नगरसेविका सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या मागणी आणि पाठपुराव्याने कुडाळ नंगरपंचायतीस मंजूर ओपन जीमचा शुभारंभ हिंदु नववर्षाच्या सुरुवातीला हिंदु कॉलनी कुडाळ येथे कुडाळ नगराध्यक्ष सन्माननीय ओंकारजी तेली तसेच हिंदु कॉलनी मित्रमंडळ अध्यक्ष श्री अशोक मालवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गिर्यारोहक व उत्कृष्ट खेळाडू डॉ. जयसिंह रावराणे तसेच उत्कृष्ट राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू सौ.अर्चना गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्यांच्या विषेश प्रयत्नातून सदर ओपन जीम मंजूर झाली.नगरसेविका सौ.संध्या तेरसे तसेच हिंदु कॉलनीतील रहिवासी उपस्थित होत्या.
या जिमसाठी नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत.त्यामुळे नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंस चे नियम पाळण्यासाठी कमीतकमी लोकांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.गेली दोन वर्षे पाठपुरावा करून लहान थोर सर्वांनाच उपयुक्त असे
ओपन जीम हिंदु कॉलनीमधे सुरू केल्याबद्दल कॉलनीतील रहिवासी विषेशतः महिला वर्गाने सौ संध्या तेरसे यांचे विषेश कौतुक आणि अभिनंदन केले.
यावेळी अध्यक्ष श्री अशोक मालवणकर यांनी नगराध्यक्ष श्री ओंकार तेली आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे हिंदू कॉलनी च्या वतीने आभार मानले .त्याच प्रमाणे जिल्हा क्रिडा अधिकारी श्री विजय शिंदे यांचे विषेश सहकार्य मिळाल्याबद्दल सौ तेरसे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.