कुडाळ /-

कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस असोसिएशनच्या वतीने आज शुक्रवारी १६ एप्रिलला कुडाळ तहसीलदार यांना कर्मचाऱ्यांच्या लसीकरण संदर्भात निवेदन ! देण्यात आले.यावेळी निवेदन कुडाळ तहसीलदार यांनां देताना कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस असोसिएशनचे अध्यक्ष श्री.अभय नाईक, सदस्य श्री.दिपक परब ,श्री.आप्पा सावंत ,श्री.हरीचंद्र लंगवे उपस्थित होते.या विषयी लवकरच नगरसेविका सौ.संध्या तेरसे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लक्ष वेधणार आहेत असे सांगितले.

गेल्या वर्षीच्या कोविड १९ च्या महामारीच्या काळात आम्ही सर्व केमिस्टनी तत्पर सेव दिलेली होती है आपणास माहीत आहेच. सध्या पुन्हा या आजाराने डोके वर काढले आहे. सर्वत्र हाहाकार मनला आहे. अशा परिस्थितीतही आम्ही सेवा देण्यास तयार आहोत.मात्र आमची औषध वितरण प्रणाली हि कंपनी एजंट घाऊक विक्रेता किरकोळ विक्रेता (मेडिकल स्टोअर्स) अशा साखळीत सुरु असते.यापैकी घाऊक औषध विक्रेता व किरकोळ औषध विक्रेता हे जिल्हा स्तरावर / गाव पातळीवर कार्यरत असतात.या आमच्या आस्थापनेत या कर्मचान्यांपैकी बहुतेक हे जवळच्या गावातून ये-जा करत असतात.यांच्याशिवाय औषध वितरणाचे काम पूर्ण होणे शक्य नाही.यातील बरेचसे कर्मचारी वय वर्षे २० ते ४४ या वयोगटातले असतात आहेत.

एकंदर परिस्थितीचा विचार करता आमच्या आस्थापानातील कर्मचा-यांना लसीकरण केले गेले नाही तर हे आमचे कर्मचारी कामावर येऊ शकणार नाहीत / येणार नाहीत. याचा परिणाम औषध वितरण व्यवस्थेवर होऊन औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, तरी आमच्या आस्थापनेतील सर्व कर्मचान्यांना लसीकरण करण्याची परवानगी मिळणे अनिवार्य आहे. तसे न झाल्यास व त्यामुळे बाजारात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही.तरी यावर तात्काळ उपाय योजना करावी असे केमिस्ट अँड ड्रगीस्ट कुडाळ असोसिएशन च्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page