निवती येथे सापडलेल्या जख्मी समुद्री गरुडाला प्राणीमित्र प्राणिमित्रांकडून जीवदान !

निवती येथे सापडलेल्या जख्मी समुद्री गरुडाला प्राणीमित्र प्राणिमित्रांकडून जीवदान !

कुडाळ /-

निवती येथे दिपेश मेतर यांना एक समुद्री गरुड जख्मी अवस्थेत सापडला होते. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती युवा फोरम भारत संघटना या संस्थेच्या उपाध्यक्ष संपदा तुळसकर यांना दिली होती. यानंतर संपदा तुळसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष श्री.सर्वेश पावसकर यांच्या माध्यमातून वन अधिकारी अमृत शिंदे यांना संपर्क साधत वनविभाग अधिकारी गावडे यांच्या मदतीने त्या गरुडावर प्रथमोपचार करून त्या गरुडाचे प्राण वाचवले असून, त्यानंतर त्या गरुडाला नैसर्गिक अधिवासात सोडत जीवनदान दिले आहे.यावेळी आनंद मेतर, शंकर मेतर हे प्राणीमित्र देखील उपस्थित होते.

अभिप्राय द्या..