वेंगुर्ला तालुक्यात नव्याने १० व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात नव्याने १० व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात आज शनिवारी आलेल्या कोव्हिड १९ अहवालात नव्याने १० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.आजच्या सर्व पॉझिटिव्ह व्यक्ती या ग्रामीण भागातील असून यामध्ये वेतोरे देऊळवाडी येथील ६,
आडेली भंडारवाडी येथील १,आडेली भटवाडी येथील १,
मठ सिद्धार्थवाडी येथील १,
वजराट येथील १ असे कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.तालुक्यात ग्रामीण भागात कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती दररोज आढळून येत असून नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी,असे आवाहन डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..