कुडाळ /-
महाराष्ट्र राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी कॉनबॅकच्या बांबू आधारित विविध उपक्रमांना भेट देण्यासाठी दि. ०८ एप्रिल २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा खास दौरा केला. यावेळी त्यांच्या सोबत कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार श्री. वैभवजी नाईक, जिल्हा प्रमुख श्री. संजय पडते, सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे अध्यक्ष श्री. सतीश सावंत, जिल्हा परिषद गटनेते श्री नागेश परब, तालुका प्रमुख श्री. राजन नाईक, बबन बोभाटे, विकास कुडाळकर, अमरसेन सावंत, संतोष शिरसाट, तुळशीदार पिंगुळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कॉनवॅकच्या मुख्य कार्यालयात त्यांनी भेट देऊन बांबूच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लागवड पध्दतीची विशेषतः व मर्यादांची सविस्तर माहिती घेतली. बांबूच्या संशोधन केंद्रावर कॉनबॅकचे संचालक श्री. मोहन होडावडेकर यांनी त्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. श्री. मिलिंद पाटील यांनी बांबू लागवडीच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले. या चर्चेमध्ये जिल्ह्यातील प्रगतशील बांबू लागवडदार शेतकरी श्री. दादा बेळणेकर, श्री. प्रभाकर परब, श्री. अनिल सावंत, श्री. बाजीराव झेंडे, श्री. डीयागो डीसोजा, श्री. मिलिंद पाटील यांनी सहभाग घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांबूच्या उपलब्धतेचे सर्वेक्षण करण्यात यावे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगा बांबूवर संशोधन करुन खात्रीशीर रोपांची निर्मिती करण्यात यावी, इतर कोकणच्या वातावरणाला पुरक ठरणाऱ्या इतर जातीच्या बांबूची सरसकट लागवड करण्यापूर्वी प्रगतशिल शेतक-या मार्फत त्याचे प्रदर्शनी क्षेत्र विकसित करुन त्याचे परिणाम अभ्यासून त्यानंतरच सामान्य शेतकऱ्यापर्यंत त्याच्या लागवडीबाबत उक्त करण्यात यावे. सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये निळेली येथे कोकण कृषी विद्यापीठामार्फत बांबू संशोधन केंद्र उभारण्यात यावे. आदी मागण्या यावेळी कृषी मंत्र्यासमोर ठेवण्यात आल्या.
कृषी मंत्र्यांनी सविस्तर चर्चेत सकारात्मक प्रतिसाद देताना कॉनबॅकच्या १७ वर्षाच्या बांबू संशोधन व विकासाच्या कार्याची वाखाणणी केली. त्याच बरोबर बांबू विषयामध्ये सर्वकष सर्व समावेशक अभ्यासाकरीता व प्रक्रिया बाजारपेठेकरीता स्थानिक आमदार श्री. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कृषी विद्यापीठ, कृषी खाते, कॉनबॅक व स्थानिक प्रगतशिल शेतकरी यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठकीचे आयोजन करुन या विषयाचा परिप्रेक्ष आराखडा तयार करुन हा कार्यक्रम अधिक व्यापक करण्याचे सुतोवाच केले.
यावेळी त्यांनी कॉनवॅकच्या बांबू प्रक्रिया व डिझारयीन स्टुडियोला भेट दिली. तसेच बांबू हस्तकला निर्मिती केंद्र व प्रदर्शन केंद्र भेट देऊन कामाची माहीती घेतली. तसेच या ठिकाणी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रगतशिल शेतकऱ्यांच्या रिसोर्स बँक या योजनेतील निवडक शेतकऱ्यांन सोबत संवाद साधला. या सर्व शेतकऱ्यांना उद्देशुन बोलताना त्यांनी या खरीब हंगामाच्या आराखडा बनविण्याच्या कामी आढावा म्हणुन मत जाणुन घेतली. तसेच कोणत्याही परिस्थितीत यावर्षीच्या खरीब हंगामात खतांचा पुरवठा कमी पडणार नाही याची ग्वाही दिली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उन्नती अभियानामार्फत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगांचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. त्याचबरोबर सर्व कृषी योजनामध्ये ३०% महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले असून महीला शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.
या भेटीच्यावेळी विभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व कृषी खात्याचे संबंधीत कर्मचारी उपस्थित होते. त्याच प्रमाणे चिवारचे संचालक श्री. मिलिंद ठाकुर, मॉड्युलर फर्निचर क्लस्टरचे संचालक श्री. प्रशांत काराणे, श्री. मदन सामंत, सखी पवार, तेजस नाईक, श्रीहरी बत्तलवार, मिलिंद आरोंदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.