शिवसेनेने माझ्यावर केलेली कारवाई म् अन्यायकारक.;ग्रा.पं. सदस्या प्राची नाईक

शिवसेनेने माझ्यावर केलेली कारवाई म् अन्यायकारक.;ग्रा.पं. सदस्या प्राची नाईक

वेंगुर्ला /-
शिवरायांनी नेहमीच आपल्या सैनिकांचा आणि विशेष म्हणजे महिलांचा सन्मान केलेला आहे. विरोधी पक्षाच्या स्त्रियांचाही त्यांनी सन्मान केला आहे. शिवरायांच्या ठायी अशी उच्च कोटीची नैतिकता होती. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी त्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ निर्माण करून दिले होते. नावात शिव वापरणाऱ्या सेने बद्दल इथे मात्र परिस्थिती फारच गंभीर म्हणावी लागेल.
ऐशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेरित होऊन आमच्या सारखे असंख्य कार्यकर्ते आज प्रामाणिकपणे शिवसेना पक्षाचे काम करीत आहेत. निवडणुकीवेळी वरिष्ठांनी लोकांना दिल्या गेलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली व त्याचा पाठपुरावा केला जो रस्ता मागील वीस वर्षे पाठपुरावा करून फक्त नारळ फोडण्यापलीकडे काहीच हालचाल न झाल्याने स्थानिक जनतेने केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला यात गैर काय ? स्थानिक पातळीवर सर्व सामान्य जनतेच्या रोषाला स्थानिक लोकप्रितिधींना तोंड द्यावे लागते, त्यामुळे एखादे विकास काम अगोदर मंजूर झालेले असेल व ते नंतर यादीतूनच गायब होत असेल तर लोकांच्या भावना आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे मांडणे हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचे काम असते. अशा पाठपुराव्याची दखल घेऊन विकासकामे पूर्णत्वास नेली, तर त्यामुळे आपल्याच पक्षाची मान उंचावली असती आणि मी नेहमीच पक्षाची मान उंचावण्यासाठी काम केलेले आहे, याचे चांगलेच फळ मला पक्षाने दिले आहे.पक्षाने माझ्यावर कारवाई करण्या अगोदर स्वतःच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या चुका शोधल्या पाहिजे होत्या. कोणतीही कारवाई करण्या अगोदर कार्यकर्त्यांना समज देणे, संधी देणे आवश्यक असते. परंतु आमच्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याची कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता व मला माझी बाजू मांडण्याची संधी न देता मी राजकारणा पेक्षा समाजकारण अधिक करत असल्यानेच व माझा चुकीच्या कामाबद्दल चा उठवत असलेला आवाज दाबण्यासाठी माझे मानसिक खच्चीकरण करण्याच्या उद्देशानेच माझ्यावर पक्षा मार्फत कारवाई केली आहे. मला अशा कारवाईचा काहीच फरक पडत नाही. मी या पुढे ही मिळेल त्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढा देतच राहीन व गावातील विकास कामांचा पाठपुरावा करत राहीन. जनता माझ्या सोबत आहे, त्या मुळे मी खंबीर आहे,असे शिरोडा ग्रामपंचायत सदस्या प्राची प्रकाश नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

अभिप्राय द्या..