वैभववाडी /-
हेत राववाडी येथील दिपक बाबू संकपाळ वय ५० या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ९. वा. सुमारास घडली.
मयताचे वडील बाबू भिकू संकपाळ वय ८०.यांनी याबाबत वैभववाडी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस हेड काँस्टेबल राजू जामसंडेकर व पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. दिपक संकपाळ याला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत त्यांने घरासमोरील फणसाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगी, मुलगा, वडील असा परिवार आहे.