कुडाळ /-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते मात्र या आदेशांची पायमल्ली कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट बनलेल्या कुडाळमध्ये झाल्याचे दिसून आले आज (बुधवार) कुडाळचा आठवडा बाजार मुख्य बाजारपेठेमध्ये हा आठवडा बाजार मोठ्या प्रमाणावर भरला होता नागरिकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणावर होती मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत होते याबाबत कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आमचे कर्मचारी आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांना पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी सांगत आहेत असे त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा फैलाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि कुडाळ हे सध्या कोरोनाविषाणूचा हॉटस्पॉट बनले आहे असे असताना नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील सगळे आठवडी बाजार बंद ठेवण्यात संदर्भात आदेश काढले होते मात्र या आदेशाची पायमल्ली कुडाळ शहरात केल्याचे दिसून येत आहे आज बुधवार कुडाळचा आठवडा बाजार या आठवडा बाजारासाठी मुख्य बाजारपेठेत नेहमी आठवडा बाजाराप्रमाणे दुकाने थाटण्यात आली होती. नागरिकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणावर झाली होती मात्र कुडाळ- वेंगुर्ला या रस्त्यावर किरकोळ व्यापारी वगळता इतर व्यापारी आले नव्हते मात्र मुख्य बाजारपेठेत झालेली गर्दी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे भंग केल्याचे दिसून येत होते असे असताना नगरपंचायती मार्फत ध्वनीक्षेपणावरून सातत्याने कोरोनाचे नियम आणि आठवडी बाजाराचे नियम सांगितले जात होते या नियमांची पायमल्ली नागरिक करताना दिसत होते याबाबत कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आठवडा बाजार नेहमीप्रमाणे भरलेला नाही पण शहरात गर्दी आहे. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कुडाळ बाहेरील व्यापाऱ्यांना हटवण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.