वेंगुर्ला /-
भाजप स्थापना दिनानिमित्त भाजप शिरोडा शहर कार्यालय येथे प्रसन्ना देसाई सरचिटणीस भाजप सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या माध्यमातून शिरोडा गावातील ७० वर्षापुढील हरीश्चंद्र परब,श्रीराम वारखंडकर,मनोहर होडावडेकर,गुरुदास शिरोडकर,विजय पडवळ,कृष्णा उर्फ नाना शिरोडकर,जयराम गोडकर,रामचंद्र आदुर्लेकर या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,वेंगुर्ला मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला मंडल चिटणीस बी.आर.वायगंणकर,वेंगुर्ला मंडल उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,कोकण विकास आघाडी मुंबई उपाध्यक्ष नितीन गावंकर,सिंधुदूर्ग जिल्हा मच्छीमार सेल अध्यक्ष दादा केळूस्कर,शिरोडा ग्रा.पं. सरपंच मनोज उगवेकर,शिरोडा ग्रा. पं सदस्य समृद्धी धानजी,शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख विदयाधर धानजी,शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी,वेंगुर्ला मंडल महिला आघाडी सदस्य गंधाली करमळकर,शिरोडा शहर महिला आघाडी अध्यक्ष संध्या राणे,भाजप शिरोडा शहर पदाधिकारी,बुथ अध्यक्ष, जयानंद शिरोडकर,चंद्रशेखर गोडकर,नितीन तारी,ज्येष्ठ पदाधिकारी बबन आडारकर,अनिल गावडे उपस्थित होते.