सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नव्याने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी आठवडी बाजार बंद ठेवणे गरजेचे आहे. तरी नागरिकांनी व स्थानिक प्रशासनाने सर्व आठवडी बाजार बंद ठेवावेत असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.