वेंगुर्ला /-
वेंगुर्ले नगरपरिषदेने टेबलटेनिस व कॅरम या खेळाची दालने निर्माण करून वेंगुर्लेतील शालेय व महाविद्यालयीत विद्यार्थ्याबरोबरच युवकांना खेळाची संधी शहराच्या मध्यवर्ती निर्माण केलेली आहे. हे खेळ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व जागतिक पातळीवर खेळले जात असून मान्यता असलेले आहेत. या खेळातील गुणांमुळे युवक-युवतींना खेळातील सर्टीफिकेटनुसार नोकरीही खेळाच्या आरक्षणातून मिळते. वेंगुर्ले नगरपरिषदेने शहरांत मध्यवर्ती ठिकाणी खेळाडूंची या खेळाची असलेली मागणी पूर्ण केलेली असून या खेळाच्या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यानी, युवकांनी व विद्यार्थींनी लाभ घेऊन यशस्वी खेळाडू बनावे. तसेच जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील या खेळांच्या स्पर्धात सहभाग घेऊन वेंगुर्लेचे व आपले नाव रोशन करावे, असे प्रतिपादन वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी मोफत खेळांच्या प्रशिक्षण शुभारंभ प्रसंगी केले.वेंगुर्ले कॅम्प येथील रायफल शुटींग रेंज हॉल नजीकच्या इमारतीत वेंगुर्ले नगरपरीषदेने सुरू केलेल्या टेबलटेनिस व कॅरम हॉलमध्ये शहरातील खेळाडूंसाठी ४ ते १० एप्रिल कालावधीत मोफत टेबलटेनिस व कॅरम खेळाच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर क्रिडा प्रशिक्षक जयराम वायंगणकर, कॅरम प्रशिक्षक शुभंम मुंडले, टेबलटेनिस प्रशिक्षक नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते.वेंगुर्ले नगरपरीषदेचे सहाय्यक कार्यालय अधिक्षक वैभव म्हाकवेकर, प्रशासकिय अधिकारी संगीता कुबल, कर्मचारी सागर चौधरी, अतुल अडसुळ, सुधाकर राऊळ, स्वप्नील कोरगांवकर आदीसह दोन्ही खेळांचे खेळाडू उपस्थित होते.