कोरियोग्राफर दिपाली शिरसाट -परब हीचे निधन..

कोरियोग्राफर दिपाली शिरसाट -परब हीचे निधन..

मालवण /-

मसुरे गडघेरा बाजारपेठ येथील प्रसिद्ध नृत्य कोरियोग्राफर, हौशी नाट्य रंगभूमी कलाकार दीपाली प्रशांत शिरसाठ हीचे मसुरे येथील राहत्या घरी निधन झाले. शुक्रवारी रात्री उशिरा मसुरे येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीपाली हिने मराठी व्यवसायिक नाटकांमध्ये काम केले होते. तसेच जिल्हा परिषदच्या शाळांना मोफत नृत्याचे मार्गदर्शन आणि नृत्य प्रशिक्षण दिले होते. जिल्ह्यामधील विविध जिल्हा स्तरीय नाट्य, नृत्य स्पर्धा ना तिने परीक्षकाची भूमिका बजावली होती. दिपाली हिला तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय कला क्षेत्रातील विविध पुरस्कार मिळाले होते.सामाजिक क्षेत्रात मसुरे गावात तिचे मोठे योगदान होते. उत्तम रांगोळीकार म्हणून सुद्धा ती मसुरे गावात प्रसिद्ध होती. विविध व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकांना पार्श्वगायिका म्हणून सुद्धा दीपाली हिने आपला आवाज दिला होता. मसुरे गावामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून दिपाली हिने विविध उपक्रम राबविले होते.तिच्या पश्चात मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ,बहीण, भावोजी, काका, काकी, आत्या, भाचा, भाची, पुतणी असा मोठा परिवार आहे. मसूरे येथील बबन परब यांची ती कन्या होय.

अभिप्राय द्या..