कुडाळ /-
जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर पीक विम्याचे पैसे लाभार्थी शेतकऱयांच्या खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांनी श्री परब यांचे आभार मानले श्री परब यांनी या प्रश्नांकडे खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधले होते
वातावरणातील अचानक होत असलेले बदल व हवामानातील होत असलेले चढउतार किंवा अवकाळी होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाचे नुकसान होऊ नये म्हणून अनेक शेतकरी,बागायतदार आपल्या पिकाचा पीकविमा उतरवित असतात.या वर्षीच्या हंगामात वातावरणामध्ये चढउतार होऊन सुद्धा शेतकरयांना त्यांच्या पीक विम्याची रक्कम अद्याप विमा कंपनीने दिलेली नव्हती.ही बाब निदर्शनास येताच वेताळबाबर्डे जि प सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब यांनी जिल्हा कृषी अधीक्षक श्री म्हेत्रे यांची भेट घेऊन वस्तुस्थितीची माहिती करून घेतली तसेच शिवसेना लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत ,आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास ही बाब आणून देताच,त्यांच्या माध्यमातून शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा होऊन गुरुवारी (ता 10) संबंधित आंबा नुकसानग्रस्त लाभार्थी शेतकऱयांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली.
कोरोना संक्रमनामुळे ढासळलेली आर्थिक घडी व त्यातून निर्माण झालेली आर्थिक विवंचना यामध्ये शेतकऱयांच्या खात्यावर पैसे आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे,त्यांनी शिवसेना नेत्यांचे आभार मानून श्री नागेंद्र परब यांना धन्यवाद दिले आहेत.