वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने तीन कृषी कायद्यांविरोधात उपोषण –

वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने तीन कृषी कायद्यांविरोधात उपोषण –

वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी वेंगुर्लाच्या वतीने शेतकऱ्यांच्या भारत बंद ला पाठिंब्यासाठी तीन कृषी कायद्याविरोधात तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले.यावेळी भाजप सरकार हटाओ-देश बचाओ, भाजप हटाओ -किसान बचाओ तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत उपोषण छेडण्यात आले.
या उपोषणात वेंगुर्ले काँग्रेस तालुकाध्यक्ष विधाता सावंत,प्रांतिक प्रतिनिधी हिरोजी उर्फ दादा परब,जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख,शहरअध्यक्ष प्रकाश डिचोलकर,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे,नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे,नगरसेविका कृतिका कुबल,स्नेहल खोबरेकर, उपसभापती सिद्धेश परब,पं. स.सदस्या साक्षी कुबल,तसेच समिर नागवेकर, अंकुश मलबारी,सागर नांदोसकर,रमाकांत दाभोलकर,कृष्णा आचरेकर, अल्ताफ शेख,प्रणव गावडे, विजय खाडे,कुंदा पै आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच पेट्रोल व डिझेल वर भरमसाठ कर लाऊन देशातील जनतेला लुटण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. घरगुती गॅसच्या दरात प्रचंड वाढ करून गृहिणींच्या अडचणी वाढवल्या आहेत. यामुळे महागाईत प्रचंड वाढ झाली आहे,यासाठी देशातील शेतक-यांनी काळ्या कृषी कायद्याच्या व महागाईच्या विरोधात ‘भारत बंद’ पुकारला आहे. शेतक-यांच्या या बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार
हे उपोषण करण्यात आले.

अभिप्राय द्या..