वैभववाडी/-

सध्या जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याची आवक सुरू होत आहे. ग्राहकांकडून हापूस आंब्यास प्रथम दर्जाची मागणी असते. त्याचा गैरफायदा व्यापाऱ्यांकडून घेतला जातो. तो म्हणजे देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये हापूस सदृश्य इतर दुय्यम प्रतीचा आंबा घालून इतर राज्यातील आंब्याची विक्री केली जाते. हापूस सदृश्य आंबा हापूस म्हणून विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यातून नेहमीच्या हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यास फायदा होत नाही. तसेच चोखंदळ ग्राहकांची फसवणूक होते हे टाळणे गरजेचे आहे अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे करण्यात आली आहे.
संदर्भ क्रमांक- १) वस्तूच्या भौगोलिक निर्देशन (नोंदणी व संरक्षण) कायदा १९९९.
२)भौगोलिक निर्देशन संस्था क्रमांक १३९ व प्रमाणपत्र क्रमांक ३२४.
त्यासाठी आपणाकडून कर्तव्यात्मक प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. ती म्हणजे वरील संदर्भ क्रमांक एकच्या कायद्याचे वाचन व्हावे व त्या कायद्यानुसार वरील संदर्भ क्रमांक दोनद्वारे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर याच जिल्ह्यामधील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना “हापूस आंबा” हा शब्द वापरून त्यांचा आंबा विक्री करण्याचा अधिकार वरील संदर्भ क्रमांक एकद्वारे प्राप्त झालेला आहे. इतरत्र आंबा उत्पादक व व्यापाऱ्यांनी देवगड, रत्नागिरी हापूस असे उल्लेख केलेले बॉक्स सरसकट वापरून दुय्यम आंबा विक्री करणे हे कायदा व नियम मोडणारी कृती आहे.
तरी शेतकरी व ग्राहक हितार्थ ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने पुढील मागणी केली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर येथील आंबा उत्पादकांची लेखी मागणी असल्याशिवाय देवगड, रत्नागिरी हापूस नावाचा उल्लेख करून आगाऊ बॉक्स तयार करणाऱ्या कारखान्यांची, व्यापारी यांची पाहणी, तपासणी करून वरील संदर्भ क्रमांक एक नुसार कारवाई पूर्वसूचना-समज-नोटीस द्यावी व कारवाई करावी.
घाऊक- किरकोळ फळ विक्रेते तसेच उत्पादित माल विक्री करणाऱ्यांची पण पहाणी-तपासणी करून संदर्भ क्रमांक दोननुसार कारवाई पूर्वसूचना- समज-नोटीस द्यावी व कारवाई करावी.
हापूस नाव व्यवसायासाठी वापरणे पूर्वी संदर्भ क्रमांक एक नुसार योग्य अयोग्य की कायदेशीर माहिती संबंधितांकडून घेतली जावी. यासाठी आपल्या स्तरावरून प्रबोधन करून त्या पश्चात आठ दिवसांनी कारवाई पूर्वसूचना- समज- नोटीस द्यावी व कारवाई करावी अशी विनंती ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग जिल्हाअध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष एकनाथ गावडे, संघटक सिताराम कुडतरकर व सचिव संदेश तुळसणकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page