वैभववाडी/-
ठाकरे सरकारचे करायचे काय… खाली डोके वर पाय. ठाकरे सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत वैभववाडी भाजपा पदाधिकार्‍यांनी ठाकरे सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषना देत निषेध आंदोलन केले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रु वसुलीचे टार्गेट निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दिले असल्याचे पत्र माजी पोलीस आयुक्त परमवीर यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे.हा प्रकार निंदनीय आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात निषेध आंदोलन भाजपचे कार्यालय समोर करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी,वैभववाडी पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे, जि. प. सदस्य शारदा कांबळे, सुधीर नकाशे, राजेंद्र राणे, संजय सावंत, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, महिला आघाडी प्रमुख भारती रावराणे, पं.स. सदस्य हर्षदा हरयाण, बाळा हरयाण, बाबा कोकाटे, शरद कांबळे, नारायण मांजरेकर, आशिष रावराणे, गोपाळ कोकाटे, सूर्यकांत कांबळे व कार्यकर्तेमोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page