सिंधुदुर्गात पठाणी व्यवहार चालू देणार नाही.;महाराष्ट्र संघर्ष कर्जदार समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर ईशारा..

सिंधुदुर्गात पठाणी व्यवहार चालू देणार नाही.;महाराष्ट्र संघर्ष कर्जदार समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर ईशारा..

सिंधुदुर्ग/-

व्हेईकल फायनान्सच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चोलामंडलम् फायनान्सच्या आर्थिक व्यवहाराबाबत अनेक कर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.ॲडीशनल इंटरेस्ट,चेक बाऊन्स अँड अदर चार्जेस अशा नावाखाली अवास्तव आकारणी करत कर्जदारांना लुबाडण्याचा गोरखधंदा चोलामंडलम फायनान्सने चालवला आहे.कर्जमुदत संपल्यानंतर चेक बाऊन्स सदराखाली अवास्तव रक्कम आकारत गाडी कर्जदारांच्या नावावर देण्यात आडकाठी करत रक्कम वसूल केली जाते.चेक बाऊन्ससाठी किती रक्कम आकारली जावी,अदर चार्जेस म्हणजे नेमके काय याबाबत सारेच गौडबंगाल असून विचारणारे कोणी नसल्याने अक्षरशः लूटमार चालली आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधित विभागांकडे चोलामण्डलम् च्या फायनान्स कंपनीच्या व्यवहारांची संघर्ष समिती तक्रार दाखल करत आहे. ज्या कर्जदारांच्या याबाबत आणखी तक्रारी असतील त्यांनी महाराष्ट्र कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या परिचित कार्यकर्त्यांकडे आपल्या तक्रारी द्याव्यात. सिंधुदुर्गात असला पठाणी व्यवहार चालू देणार नाही, तक्रारी नंतरही कर्जदारांना वेळेत न्याय मिळाला नाही, तर संघर्ष समितीतर्फे पुढील विचार केला जाईल असा इशारा महाराष्ट्र कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड प्रसाद करंदीकर यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..